आरोग्य
घाटीत परिचारिकांचे काम बंद आंदोलन, आरोग्य सेवेवर होणार परिणाम
NURSES PROTEST FOR PROMOTIONS AND ALLOWANCES
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे गुरुवारी परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदूमती थोरात, शासकीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष शुभमंगल भक्त, द्रोपदी कर्डिले, महेंद्र सावळे, प्रतिभा अंधारे, कालिंदी इधाटे, वंदना कोळनुरकर, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद आदींनी सहभाग घेतला.
क्राईम
दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त! विवाहितेवर कैचीनं वार करून पती फरार
गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : बजाजनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यसनी पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने संतप्त झालेल्या पतीने धारदार कैचीनं तिच्या मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.