राज्यात आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणांमध्ये आता तिसरी आघाडीही सक्रिय झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना तिसऱ्या आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.
या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर बोलताना ते म्हणाले, “प्रत्येकाची आपली भावना असते. राजरत्न आंबेडकर साहेबांची भावना आहे आणि सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे. पण माझं लक्ष स्पष्ट आहे – माझ्या समाजाला पुढे न्यायचं आहे.”
त्यांनी पुढे दसरा मेळाव्याबद्दल बोलताना सांगितले, “हा दसरा मेळावा सगळ्यांचा आहे, मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. माझी तब्येत अजून पूर्णपणे बरी नाही, पण तरीही दसरा मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. राज्यातील मराठा समाजाची इच्छा होती की, हा दसरा मेळावा मोठ्या प्रमाणावर व्हावा, त्यामुळे बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालये उघडी ठेवण्यात येतील.”
मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील मराठा समाजाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*