एका सरकारी बँकेच्या व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ तयार करण्याच्या माध्यमातून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० लाखांची खंडणी उकळणाऱ्या सिद्धार्थ ठोकळ आणि एका २६ वर्षीय महिलेविरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी व्यवस्थापकाच्या कर्ज प्रकरणातील फाईली मंजूर न झाल्याने ही कटकारस्थान रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सिद्धार्थ ठोकळ, जो एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे, त्याने व्यवस्थापकाकडे कर्जासाठी ४० फाईली दिल्या होत्या, परंतु व्यवस्थापकाने त्या फाईली विविध कारणांमुळे मंजूर केल्या नाहीत.
महिलेने व्यवस्थापकाला सतत संपर्क साधून आणि प्रेमाच्या नाटकाद्वारे जाळ्यात ओढले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्या संबंधांचे चित्रीकरण करून ४० लाखांची खंडणी मागितली.
पोलिसांनी सापळा रचून या खंडणीखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी व्यवस्थापकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले, मात्र पोलीस मागावर असल्याचे लक्षात आल्यावर ते फरार झाले.
सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत आणि याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*