भारतीय जनता पक्षानं (भाजप) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. महायुतीतील जागावाटपानंतर भाजपाने सुरक्षित असणाऱ्या जागांचा विचार करत या पहिल्या यादीत उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
यात महत्त्वाचे नाव म्हणजे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपने भोकर मतदारसंघातून संधी दिली आहे. तसेच, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.
औरंगाबादमधील गंगापूर मतदारसंघातून प्रशांत बंब, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, आणि फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा ताई चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीनंतर भाजपाच्या अन्य महत्त्वाच्या जागांवरही चर्चा होणार असून, आगामी काळात पक्षाच्या रणनीतीनुसार निवडणुकीतील पुढील पावले उचलली जातील.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*