छत्रपती संभाजीनगर शहरात अमलीपदार्थ प्रतिबंध विभागाच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ९०० नशायुक्त बाटल्यांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीणकुमार गायकवाड यांनी केले असून, अमली पदार्थविरोधी पथकाच्या टीमने ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.
पोलिसांनी प्राप्त केलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरात दोन ठिकाणी छापा मारून अमलीपदार्थांचे साठे जप्त करण्यात आले. पहिल्या ठिकाणी, पोलिसांना ९०० नशायुक्त बाटल्यांचा साठा मिळाला असून, त्याची अंदाजे किंमत 1,75,000 रुपये आहे. या साठ्यात विविध प्रकारचे प्रतिबंधित अमलीपदार्थ होते, ज्यात काही औषधे आणि इतर नशायुक्त पदार्थांचा समावेश होता. दुसऱ्या ठिकाणी सुमारे 14,98,765 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे, ज्यात अन्य अवैध वस्तूंचा समावेश आहे.
ही कारवाई NDPS कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली असून, यात अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईत अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अमलीपदार्थांचा व्यापार करणाऱ्या गिरोहाचे काही प्रमुख सदस्य असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासात असे आढळले आहे की, हे पदार्थ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करण्यात येत होते आणि त्याचा वापर मुख्यतः स्थानिक तरुणांमध्ये होतो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*