शहरात दिवाळीच्या सणातच जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काल रात्री १.४५ वाजता जायकवाडी पंप हाऊसची वीज गेल्यामुळे पंपिंग थांबले होते. १.५५ वाजता वीज परत आल्यावर पंपिंग सुरू करण्यात आले, परंतु १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये प्रेशर शून्यावर होते, त्यामुळे फारोळा येथे पाणी पोहोचत नव्हते.
फारोळा ते जायकवाडी मार्गावरील जलवाहिनीची तपासणी केल्यानंतर जायकवाडी धरणाजवळील पिंपळवाडी येथे १२०० मिमी व्यासाच्या पाईपमध्ये गळती असल्याचे आढळले. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासन पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहे.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*