गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा ६ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एका ब्रोकरने २० जणांना गंडा घातला आहे. आरोपीचे नाव राहुल राजेंद्र काबरा असून, त्याने २ कोटी रुपये लुबाडल्याची माहिती पोलिसांकडे मिळाली आहे. देवळाई परिसरातील निवृत्त शिक्षक हेमंत रंगनाथ जगताप यांच्या तक्रारीवरून रविवारी (२७ ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हेमंत यांना त्यांचे नातेवाईक अनिल तांगडे यांनी गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यामुळे अनिल तांगडे यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत हेमंत यांनी १० लाख रुपये गुंतवले, मात्र परतावा न मिळाल्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पश्चिम बंगालमधील झीरोधा कंपनीच्या ब्रोकर व अधिकृत लायसन्स होल्डर राहुल काबरा याने हा गंडा घातला. हा प्रकार गोल्डन सिटी सेंटर येथे घडला असून, एम सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने सहा महिने नियमित व्याज दिल्यानंतर परतावा देणे बंद केले. फिर्यादी हेमंत जगताप यांनी २३ एप्रिल २०२१ रोजी दोन लाख रुपये गुंतवले होते. आरोपी काबराने त्यांना दोन लाखांचा धनादेश आणि करारनामा दिला होता. परंतु, जुलै २०२३ नंतर परतावा देणे बंद केले.
हेमंत जगताप यांना तांगडेने राहुल काबराकडे नेले होते, जो झीरोधा कंपनीचा अधिकृत स्टॉक ब्रोकर होता. काबराने जगताप यांना ६ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. आता काबरा घर सोडून पसार झाला असून, पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*