गंगापूर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्यासारखेच नाव असणारे इतर दोन उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी एकाने बहुजन समाज पक्षाकडून, तर दुसऱ्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या तीन सतीश चव्हाणांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीमध्ये ९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ४५ उमेदवारांचे एकूण ५९ अर्ज वैध ठरले आहेत. महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब, तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण, शिवसेना उबाठा गटाच्या अॅड. देवयानी डोणगावकर, काँग्रेसचे किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर निळ, विलास चव्हाण आदींनी उमेदवारी दाखल केली आहे.

विशेष बाब म्हणजे गंगापूर मतदारसंघात सतीश चव्हाण नावाचे एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश भानुदासराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाकडून सतीश तेजराव चव्हाण (करवंद, चिखली, बुलढाणा) आणि अपक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील सतीश हिरालाल चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूक लढवताना दिसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

मतविभाजनाची शक्यता

हे तिन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. मतदारांसमोर नेमके कोणत्या सतीश चव्हाणला मतदान करावे, हा प्रश्न उभा राहणार आहे. यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही प्रमाणात ही राजकीय खेळी असल्याचा संशयही काहींनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या या अनपेक्षित वळणामुळे गंगापूर मतदारसंघातील निवडणुकीला रंगत आली आहे. आता पुढील काही दिवसांत कोणते राजकीय चित्र उभे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,528 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क