छत्रपती संभाजीनगर येथे दिवाळी साजरी करत असताना फटाके फोडण्याच्या घटनांमध्ये शुक्रवारी (१ नोव्हेंबर) तब्बल ३४ जण भाजले गेल्याचे समोर आले आहे. जल्लोषात साजऱ्या होत असलेल्या या सणात फुसके फटाके आणि स्फोटांमुळे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
यामध्ये पारदरी तांडा येथील एका १२ वर्षाच्या मुलाच्या हातात भुईनळा पेटवत असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याचा डोळा निकामी झाला आहे. त्याचप्रमाणे, सुतळी बॉम्ब हातात फुटल्याने एक व्यक्तीचा संपूर्ण हात भाजला गेला आहे.
घाटी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळीत विभागात १४ रुग्ण दाखल झाले आहेत. याशिवाय, बेंबडे हॉस्पिटलमध्ये २० जखमी रुग्ण दाखल झाल्याचे प्लास्टिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले.
फटाक्यांच्या स्फोटांमुळे झालेल्या या अपघातांमुळे अनेकजण १० टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. सणाच्या आनंदात झालेल्या या घटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*