पतीच्या मारहाणीने त्रस्त होऊन घर सोडलेल्या अंदाजे ५० वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर महिला सध्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री पडेगावच्या रस्त्यावर जखमी अवस्थेत अर्धबेशुद्ध पडलेल्या महिलेला स्थानिकांनी पाहिले. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे डॉक्टरांच्या अहवालात नमूद केले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली.
आठ दिवसांपासून बाहेरच होती फिरत
महिलेची मूळ ओळख चाळीसगाव येथील रहिवासी म्हणून झाली आहे. पतीने मारहाण केल्यानंतर ती माहेरी पडेगावला आली होती, मात्र आठ दिवसांपासून तणावाखाली घराबाहेर फिरत होती. त्याच दरम्यान अज्ञातांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. सध्या सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*