मैत्रीला काळिंमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, मित्रानेच मित्राचा शिरच्छेद करून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा फरार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा केला.
पांढरी पिंपळगाव शिवारात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख राजू किसन कापसे (वय ३५, रा. विजयनगर, गारखेडा परिसर) या युवकाची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासाची दिशा घेतल्यावर मित्राचाच सहभाग उघड झाला. आरोपी संतोष उद्धवराव जगताप यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी दत्ता सुरवसे सध्या फरार आहे.
विवादातून झाला खून:
तपासादरम्यान समजले की, मृतक राजू कापसे आणि आरोपी दत्ता सुरवसे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादातून राजू कापसे याचा धारदार शस्त्राने गळा कापून खून करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच पथके तयार केली होती. त्यांच्याद्वारे मृतकाच्या नातेवाईक व मित्रांची चौकशी करून महत्त्वाची माहिती गोळा करण्यात आली.
पोलिस तपास सुरूच:
फरार आरोपी दत्ता सुरवसेचा शोध घेतला जात असून, या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*