छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वास्तव्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी हायकोर्ट परिसरातील न्यायमूर्तींच्या निवासस्थानाच्या आवारात बिबट्या आढळल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वन विभागाने केलेल्या चौकशीमध्ये हायकोर्ट परिसरात कुठेही बिबट्याचे पगमार्क किंवा इतर कोणतेही ठसे आढळले नाहीत. या ठिकाणी दिसलेले ठसे कुत्र्याचे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी (दि. २७) रात्री वन विभागाच्या पथकाने हायकोर्ट परिसराची कसून पाहणी केली. यापूर्वी १५ जुलै रोजी शहरात बिबट्या दिसल्याचे वृत्त आले होते, त्यानंतर काही दिवस शहरात बिबट्याचीच चर्चा होती. वन विभागाने बिबट्या शहराबाहेर गेल्याचे स्पष्ट केल्यानंतर परिस्थिती निवळली होती. मात्र आता पुन्हा एकदा बिबट्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्ट परिसरात बिबट्याचे अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आश्वासन देत त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*