करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लामकाना येथील गट क्रमांक १८५ आणि गट क्रमांक ११३ मध्ये ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांना गांजाची झाडे विक्रीसाठी जोपासली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गट क्रमांक १८५ मध्ये कमलअली चॉंद शहा यांच्या शेतात छापा टाकला. येथे वालाच्या पिकामध्ये गांजाची लहान-मोठ्या आकारातील २५४ किलो वजनाची झाडे आढळून आली. या झाडांची किंमत ५० लाख ८२ हजार रुपये आहे.
याशिवाय, गट क्रमांक ११३ मध्ये चंद्रकांत रघुनाथ बारबैले यांच्या शेतात कपाशी आणि तुरीच्या पिकात लावलेली २४१ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत ४८ लाख २५ हजार रुपये आहे.
पोलिसांनी कमलअली चॉंद शहा याला अटक केली असून चंद्रकांत रघुनाथ बारबैले सध्या फरार आहे. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश वाघ, डीवायएसपी महादेव गोमारे, पवन इंगळे, दीपक पारधे, भागीनाथ वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. तसेच कृषी अधिकारी श्रमिका भालेराव यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*