छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील १८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यात ६८.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यात ३२ लाख २ हजार ७५१ मतदारांपैकी सुमारे २२ लाख ४१ हजार ४४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ९ लाख ६१ हजार ३०२ मतदारांनी मतदान टाळले. २०१९ मध्ये ६५.४५ टक्के मतदान झाले होते. यंदा पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते.
मतदारसंघनिहाय मतदानाची स्थिती:
सिल्लोड (१०४): ८०% – जिल्ह्यात सर्वाधिक
पैठण (११०): ७६.९५%
गंगापूर (१११): ७३.४५%
वैजापूर (११२): ७३.२१%
फुलंब्री (१०६): ७१.९९%
कन्नड (१०५): ६६.२०%
औरंगाबाद पूर्व (१०९): ६०.६३%
औरंगाबाद पश्चिम (१०८): ६०.४०%
औरंगाबाद मध्य (१०७): ५९.३५%
मतदान प्रक्रियेत उत्साहाचे वातावरण
बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या तासांमध्ये मतदानाच्या गतीत फारसा वेग दिसला नाही. दुपारपर्यंत काहीशी शांतता होती. मात्र दुपारी ३ नंतर मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. पैठण, औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम मतदारसंघांतील काही केंद्रांवर मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
२३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा उत्साह आणि मतदानाची वाढती टक्केवारी राजकीय समीकरणे बदलविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*