विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) नाही, त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी आयोगाने सुचविलेल्या १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राचा वापर करता येईल.
कोणकोणती ओळखपत्रे चालतील?
आयोगाने खालील १२ प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता दिली आहे:
1. आधार कार्ड
2. मनरेगा रोजगार ओळखपत्र
3. बँक किंवा टपाल खात्याचे छायाचित्रासह असलेले पासबुक
4. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
5. वाहनचालक परवाना
6. पॅन कार्ड
7. स्मार्ट कार्ड
8. पारपत्र (पासपोर्ट)
9. निवृत्तिवेतन दस्तावेज
10. सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे ओळखपत्र
11. संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांसाठी अधिकृत ओळखपत्र
12. दिव्यांगांसाठीचे विशेष ओळखपत्र
पत्ता बदलला तरी जुने ओळखपत्र मान्य
पत्ता बदलला असल्यास जुन्या पत्त्यासह असलेले मतदार ओळखपत्र देखील मान्य होईल, मात्र नाव विद्यमान मतदार यादीत असणे बंधनकारक आहे.
‘डीजी लॉकर’मधली ओळखपत्रे ग्राह्य नाहीत
मतदानासाठी डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे किंवा ‘डीजी लॉकर’मधील दस्तऐवज मान्य होणार नाहीत. फक्त मूळ कागदपत्र किंवा त्यांची वैध प्रत सादर करावी लागेल.
मनरेगा जॉबकार्डही मान्य
विशेष म्हणजे, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉबकार्ड देखील मतदानासाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
मतदानासाठी पुरेशी तयारी करून प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्काचा मतदानाचा उपयोग करावा, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*