आजचे राशीभविष्य 12 एप्रिल 2025 :

🐏 मेष (Aries) आज तुमच्या गोड बोलण्यामुळे सहकाऱ्यांकडून कामे सहज पार पडतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात संध्याकाळ आनंददायी ठरेल.

🐂 वृषभ (Taurus) वारसा हक्काने मिळणाऱ्या इस्टेट संबंधित कामे पुढे जातील. महिलांसाठी उत्साही दिवस आहे. कामात प्रगती होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

👯 मिथुन (Gemini) नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन शांततापूर्ण राहील. आरोग्याची काळजी घ्या, सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

🦀 कर्क (Cancer) खूप दिवसांपासून अडकलेली कामे प्रगतीपथावर राहतील. कौटुंबिक वातावरणात थोड्या कुरबुरी जाणवतील. खर्च जपून करा.

🦁 सिंह (Leo) तुमच्या कलेची कदर करणारी मंडळी भेटतील. आर्थिक व्यवहारात फायद्याचे योग आहेत. प्रकृतीकडे लक्ष द्या.

🌾 कन्या (Virgo) हातून चांगली निर्मिती होईल, ज्यातून आर्थिक फायदाही मिळेल. पैशांची चांगली आवक राहणार आहे. घरात मतभेद टाळा.

⚖️ तूळ (Libra) शांत आणि प्रेमळ स्वभावाने इतरांचे म्हणणे जिंकून घ्याल. घरामध्ये दुरुस्तीचे काम निघेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

🦂 वृश्चिक (Scorpio) प्रत्येक काम करताना जातीने हजर राहावे लागेल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

🏹 धनु (Sagittarius) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे.

🐐 मकर (Capricorn) नशिबाची चांगली साथ असल्याने कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. घरात समाधानाचे वातावरण असेल.

🌊 कुंभ (Aquarius) आजचा दिवस धावपळीत जाणार आहे. थकवा जाणवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय काही दिवस पुढे ढकला.

🐟 मीन (Pisces) कार्यक्षेत्रात मनासारख्या गोष्टी घडतील. प्रकृती चांगली राहणार आहे. व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण समाधानाचे असणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

891 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क