छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता देवळाई परिसरात हात साफ केला आहे. साईनील सोसायटीतील एका रो-हाऊसमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील कपाट फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेत सुमारे १३ लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

सिद्धोधन पाखरे हे साईनील सोसायटीत पत्नी आणि कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. पाखरे आणि त्यांच्या पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यांच्या बहिणीकडे हैदराबाद येथे कौटुंबिक कार्यक्रम असल्याने सोमवारी (दि. २) रात्री आठच्या सुमारास संपूर्ण कुटुंब घर बंद करून हैदराबादला रवाना झाले. घरात कोणी नसल्याची माहिती चोरट्यांना मिळाली असावी. त्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले.

घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील कपाटाची झडती घेतली. घरातील वस्तूंची उचकापाचक करत कपाटात ठेवलेली रोकड आणि दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला. मंगळवारी (दि. ३) सकाळी शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसताच त्यांनी पाखरे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघड झाले.

या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे आणि हवालदार मदने यांनी पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान घटनास्थळावरच घुटमळले.

विशेष म्हणजे, वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या सोसायटीत ही घटना घडली आहे. पाखरे कुटुंबीय परतल्यानंतर चोरीला गेलेल्या दागिन्यांचा नेमका तपशील समोर येणार असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

277 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क