छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचा हात मिळाला आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे वितरण सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल ११९ कोटी ६६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारपासून प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास सुरुवात झाली.

या मदतीच्या वितरणात वैजापूर तालुका आघाडीवर असून, तेथील ४५ हजार ४४१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. कन्नड तालुक्यात ३८ हजार १९१, गंगापूरमध्ये ३२ हजार ८५५, पैठणमध्ये ३२ हजार ८०५ आणि सिल्लोडमध्ये ३१ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा झाले आहेत.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १७ हजार ३६, फुलंब्रीतील १५ हजार ६५०, सोयगावमधील १४ हजार ७२३ आणि खुलताबादमधील १० हजार ८०४ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.

३.५२ लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

जिल्ह्यातील एकूण ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करून प्रशासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. अद्याप ३ लाख ५२ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यांत मदतीची रक्कम जमा होणे बाकी आहे.

उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत पुढील दोन दिवसांत पैसे पोहोचविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यासाठी शासकीय सुटीच्या दिवशीही जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

213 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क