आरोग्य
गणेशोत्सवात साथरोगांचा फैलाव; डेंग्यू, फ्लूचे रुग्ण वाढले
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या उत्साहात जिल्ह्यात साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. डेंग्यू, सर्दी-खोकला, फ्लू, विषमज्वर, मलेरिया आदी आजारांनी नागरिकांना हैराण केले असून, रुग्णालये रुग्णांनी अक्षरशः फुल्ल झाली आहेत. पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्न-पाणी, डास-कीटकांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील सतत बदल या कारणांमुळे डेंग्यूसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
क्राईम
आता तर हद्दच झाली! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने उकळले ५०० रुपये
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अंत्यसंस्काराची पावती मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मनपाचा कंत्राटी कर्मचारी आणि झेरॉक्स सेंटर चालक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता झोन सहामध्ये करण्यात आली. फिरोज जाफर खान (४५, रा. रोजाबाग) आणि शेख कडू इब्राहिम (५३, रा. चिकलठाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.