छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार व निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे समीर राजूरकर यांची महापौरपदी, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी बहुमताने निवड करण्यात आली. दोन्ही विजयी उमेदवारांना प्रत्येकी ७० मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी एमआयएमच्या उमेदवारांना केवळ ३३ मतांवर समाधान मानावे लागले.

महायुतीच्या या विजयात भाजपचे ५७ नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) तसेच अपक्ष नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांनी एकत्र येत महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत ‘हात वर करून’ मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. निकाल जाहीर होताच महायुतीच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या विजयामुळे शहरातील सत्तासंतुलनावर महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास विजयी नेत्यांनी व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

929 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क