छत्रपती संभाजीनगर : जेन-झी विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धमक्या देण्यात आल्या असून, आंदोलन मागे न घेतल्यास जीवे मारण्याची आणि कुटुंबीयांना लक्ष्य करण्याची भाषा वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

दिपके म्हणाले, “मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा आहे. अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाला भाजपमध्ये या, अन्यथा तुझ्या घरी जाऊन आई-वडिलांना पाहून घेऊ, तुला गोळ्या घालू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. मला भाजपमध्ये जायचे असते तर मी आधीच गेलो असतो.”

तसेच दिपके म्हणाले, “आमच्या आंदोलनाला बाहेरून निधी मिळतो आणि आमची चळवळ बाहेरून चालवली जाते, असा आरोप जर सरकार करत असेल, तर गृहमंत्री म्हणून हे अमित शाह यांचे थेट अपयश आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.”

नाशिक पोलिसांच्या व्हिडिओग्राफीसंदर्भातील एसओपी आणि जंतर-मंतरवरील पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. “पोलीस कोणत्याही एका पक्षाचे नसून संविधानाचे आहेत. जर फक्त भाजपचे आदेश पाळायचे असतील, तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, भाजप मुख्यालयासमोर उभे राहा आणि ‘मै भी चौकीदार’ म्हणा,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी केलेल्या या आरोपांवर संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,166 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क