छत्रपती संभाजीनगर : अभिजित दिपके यांनी ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ची महत्त्वपूर्ण कोअर कमिटी बैठक होणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला CJP चे प्रवक्ते तसेच कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार असून, CJP ची पुढील वाटचाल, आगामी भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवर कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन उभारायचे याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतःच्या शिक्षणाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले की, परदेशातील शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) आणि शैक्षणिक कर्जाचा (एज्युकेशन लोन) आधार घेतला होता. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे दाखविण्यास ते तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी पंतप्रधानांनीही आपली शैक्षणिक पदवी आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी केली. “पंतप्रधानांनी त्यांची कागदपत्रे जाहीर केली तर मीदेखील माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेन,” असे ते म्हणाले.

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. “माझ्या घरापर्यंत तपास यंत्रणा आली तरी मी घाबरणार नाही. मात्र, ईडी आणि सीबीआय पाठवत असाल तर त्यासोबत पंतप्रधानांची डिग्रीही पाठवा,” असा टोला त्यांनी लगावला.

झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना दिपके यांनी संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे, तसेच CJP त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि आवश्यक ती सर्व मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

राजकारणात प्रवेश करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिपके यांनी सध्या तरी निवडणूक राजकारणात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. “अनेक राजकीय पक्षांबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आम्ही सध्या CJP ला जनआंदोलन म्हणूनच पुढे नेणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, लोक एका पक्षाला मतदान करतात आणि वेगळेच चित्र समोर येते. ईडी-सीबीआयच्या माध्यमातून पक्ष फोडले जात असल्याचा आरोप होत असताना नवीन राजकीय पक्ष स्थापन करून काय उपयोग?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

370 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क