छत्रपती संभाजीनगर : शहरातील धुळे-सोलापूर महामार्गालगत करोडी शिवारातील हॉटेल निसर्ग येथे अवैध कुंटणखाना चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी या ठिकाणी छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत कुंटणखाना चालविणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५६ हजार २०० रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना हॉटेल निसर्ग येथे अवैधरित्या कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारला. यावेळी आरोपी स्थानिक तसेच परराज्यातील महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून पाच महिलांची सुटका केली. या प्रकरणात आदित्य सुनीलकुमार पांडे (उत्तर प्रदेश), रवि काशीनाथ पोळ (ठाणे), संजय बन्सी जाधव (बीड), कमलेश भालेराव (छत्रपती संभाजीनगर) आणि देविदास मुन्सी राठोड (कर्नाटक) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित महिलांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुडले आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध देहव्यापाराच्या प्रकारावर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,495 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!