छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच “ठोकून काढू, कापून टाकू” अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे फोन येत असल्याची माहितीही दानवे यांनी दिली आहे.

या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून अंबादास दानवे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, फोन कोणत्या क्रमांकावरून करण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे का याचा तपास सुरू करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांकडून सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे.

अंबादास दानवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 11 ते 14 मार्च दरम्यान सलग चार दिवस रात्री उशिरा अज्ञात क्रमांकावरून फोन येत होते. सुरुवातीला आपण त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, मात्र आज पुन्हा पहाटे 2 च्या सुमारास धमकीचा फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दानवे यांना धमकीचे फोन आल्याच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून धमकी देणाऱ्याचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपीचा माग काढण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

526 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क