छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतापनगर आणि श्रेयनगर या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी घरमालक पुण्यात असल्याची संधी साधत चोरी करण्यात आली, तर दुसऱ्या ठिकाणी अवघ्या तासाभरात घर साफ करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांमुळे उस्मानपुरा पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिली घटना प्रतापनगरमधील कासलीवाल रेसिडेन्सी येथे घडली. किरण बाजीराव कुलकर्णी (वय ६५) हे ३ मार्च रोजी कामानिमित्त घराला कुलूप लावून पुण्याकडे गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळताच चोरट्यांनी लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाट फोडून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला. १८ मार्च रोजी कुलकर्णी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

दुसरी घटना श्रेयनगर येथील श्रीराम बिल्डिंगमध्ये घडली. सुरेश बापूराव खडके (वय ७१) हे सायंकाळी कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या वेळात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून अवघ्या एका तासात घरातील ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या जलदगती चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी मंगळसूत्र, कानातले, सोन्याचे मणी, चांदीच्या वस्तू, महागडे घड्याळ तसेच बँक लॉकरच्या चाव्या असा ऐवज चोरून नेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

201 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क