छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याबाबत जाब विचारणाऱ्या पोलीस अंमलदारांना भरचौकात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना हर्सुल टी-पॉइंट परिसरात घडली आहे. बुधवारी (१८ मार्च) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात क्रूझर गाडीच्या चालकासह एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्सुल पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चिमणापूरवाडी परिसरात गस्तीवर होते. गस्त पूर्ण करून परत येत असताना, हर्सुल टी-पॉइंटवरील बसस्टॉपसमोर एक क्रूझर (क्र. एमएच २० ईई ५३३२) रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे संभाजीनगर ते फुलंब्रीकडे जाणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

यावेळी पोलीस अंमलदार मोहन सिंगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित चालकाला वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, चालकाने पोलिसांशी वाद घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. “आम्ही नगरसेवक अझहर पठाण यांची माणसे आहोत, तुम्हाला बघून घेऊ,” असे म्हणत त्याने धमकी दिली. तसेच “मी सीपी साहेबांना भेटून तुझी वर्दी उतरवीन,” असेही तो म्हणाला.

दरम्यान, गाडीत बसलेला दुसरा इसम खाली उतरून पोलीस कर्मचाऱ्याला “तुला चाकूने कापून टाकीन,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी देत दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पोपट दहिफळे करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,478 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क