छत्रपती संभाजीनगर : शेतात तुरीचे पीक आणि त्याच पिकाच्या आड गांजाची लागवड, असा प्रकार फुलंब्री तालुक्यातील लालवन परिसरात समोर आला आहे. पिशोर पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची १४१ झाडे जप्त केली. या कारवाईत तब्बल ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, या प्रकरणी ६६ वर्षीय चैनसिंग रतनसिंग बिमरोटे यांना अटक करण्यात आली आहे.

तुरीच्या शेतात लपवली गांजाची झाडे

फुलंब्री तालुक्यातील पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८ मध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पिशोर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ही झाडे जप्त करत लागवडीचा प्रकार उघडकीस आणला.

कारवाईदरम्यान गांजाची एकूण १४१ झाडे आढळून आली. त्यांचे एकत्रित वजन एक क्विंटल पाच किलो असल्याचे समोर आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात बिमरोटे यांना अटक करण्यात आली असून, शेतातील लागवडीसंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची लागवड, त्यामागील उद्देश आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्याकडे पुढील तपासाची जबाबदारी आहे.

शेतातील नियमित पिकांच्या आड प्रतिबंधित अमली पदार्थांची लागवड होत असल्याचा हा प्रकार पोलिसांच्या कारवाईमुळे समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणती माहिती पुढे येते, याकडे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

447 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क