छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात बजरंग चौकाजवळील मंगेश गॅस एजन्सीसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंटी दीक्षित असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाइकांनी सुरुवातीला आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिडको परिसरातील बजरंग चौकाजवळ असलेल्या मंगेश गॅस एजन्सीसमोर ही घटना घडली. सुरुवातीला बंटी दीक्षित यांचा अपघात घडवून आणण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, मृत तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

आरोपींना अटक; हत्येमागील कारणाचा तपास सुरू

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बंटी दीक्षित यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, हा वाद कोणत्या कारणातून झाला आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अद्याप अधिकृत तपशील स्पष्ट झालेला नाही.

भररस्त्यात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून हत्येमागील कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,270 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क