छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज MIDC परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकार गंभीर मानला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व सिलेंडर विविध कंपन्यांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

MIDC प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकत संपूर्ण परिसराची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर रिकामे गॅस सिलेंडर साठवून ठेवलेले आढळले. यानंतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सर्व सिलेंडर त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर सिलेंडर कोणत्या उद्देशाने जमा करण्यात आले होते, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, तसेच या प्रकरणाचा अवैध साठेबाजी किंवा इतर बेकायदेशीर व्यवहारांशी काही संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित कंपनी बराच काळ बंद असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वाळूज MIDC परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच उघड होण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

839 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क