छत्रपती संभाजीनगर : रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या एका केमिकल इंजिनियरचा ‘केमिकल लोचा’ अखेर उघड झाला असून, राज्यभर एमडी ड्रग्ज तयार करून पुरवठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. शहरातील शहानगर आणि मसनतपूर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये १६ मार्च रोजी छापा टाकत हा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.

या कारवाईत रोशन रवींद्र कदम (३२) आणि मयूर दीपक जाधव (२३, दोघे रा. कोपरी, आनंदनगर, ठाणे पूर्व) यांना अटक करण्यात आली आहे. रोशन कदम हा केमिकल इंजिनियर असून, त्याच्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून एमडी ड्रग्ज तयार केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.

राज्यातील अवैध ड्रग्ज विक्री, वाहतूक आणि तस्करीवर आळा घालण्यासाठी शासनाने एएनटीएफची स्थापना केली असून, या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाधीक्षक ठोंबरे यांच्या नेतृत्वात निरीक्षक गीता बागवडे व त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकला.

छाप्यात सुमारे ६५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह ३ लाख ९५ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे राऊंड बॉटम फ्लास्क, कंडेन्सर, विविध केमिकल्सच्या बाटल्या, सॉलिड केमिकल पावडर, मिक्सर मशीन, प्लास्टिक ड्रम आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमागील इतर आरोपी आणि नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,054 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क