छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने सुमारे ९.३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २००० नशेच्या गोळ्या आणि ११८ नशायुक्त सिरपच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून, शहरातील अवैध विक्रीवर मोठा आघात झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छावणी परिसरातील नगर नाका भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपी सय्यद अकरम सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी) हा बाहेरून नशेच्या गोळ्या आणि सिरपचा साठा आणून शहरात विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत छापा टाकला.

या छाप्यात २००० नशेच्या गोळ्या आणि ११८ नशायुक्त सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ३९ हजार ८२७ रुपये इतकी आहे. मात्र, कारवाईदरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक साईनाथ ढोबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संबंधित अधिकाऱ्यांसह अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, नागरिकांनी अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

580 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क