बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
राज्य सरकारने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
अत्याचाराच्या घटनेनंतर शहरातील रेल्वे सेवा ठप्प करण्यात आली असून बदलापूरमध्ये पूर्णतः बंद पाळण्यात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली असून, शाळेच्या व्यवस्थापनावर देखील कारवाई केली जाणार आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शितोळे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी सावित्री’ समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
Chatrapati Sambhaji Nagar madhile OWHER gawatil ghatnechi mahiti Chatrapati Sambhaji Nagar news la dakhva.