सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा शिवारात रविवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी वीज कोसळून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेणुका हरिदास राऊत (वय ३८ वर्षे) आणि स्वाती हरिदास राऊत (वय १७ वर्षे) अशी मृत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. 

घटनेच्या वेळी रेणुका आणि स्वाती शेतात मूग तोडत होत्या. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे त्यांनी झाडाखाली आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुर्दैवाने त्याचवेळी वीज कोसळली आणि दोघींवर ती थेट आदळली.

ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या हृदयद्रावक घटनेने सिसारखेडा गावात शोककळा पसरली आहे. मृत स्वातीच्या पश्चात तिचे वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,716 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क