सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींची फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना अलीकडेच संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे, जिथे एका विवाहित महिलेची तब्बल १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या महिलेची एका परदेशी तरुणासोबत फेसबुकवर मैत्री झाली होती, जी तिच्यासाठी खूपच महागात पडली.
ऑगस्ट २०२३ मध्ये इंग्लंडमधील असल्याचे भासवणाऱ्या तोतयाने या महिलेच्या सोने-चांदीच्या भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. या प्रकरणात महिलेने स्वतःहून १७ लाख ६९ हजार रुपये परदेशी तरुणाच्या खात्यात जमा केले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
महिला समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळेच्या वस्तीगृहाची अधीक्षक असूनही, अशा उच्चशिक्षित महिलेलाही या फसवणुकीचा शिकार व्हावे लागले. सदर प्रकरणाचा तपास पुंडलिक नगर पोलिस करीत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*