महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या गाडीवर तीन दुचाकींवर आलेल्या सहा अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. ही घटना रात्री सव्वा दहा वाजता गोलवडी भागातून शहराकडे जात असताना घडली.
सिद्धांत शिरसाट हे त्यांच्या मित्र आणि वाहन चालकासोबत गाडीमध्ये प्रवास करत होते, तेव्हा अचानक काही तरुण दुचाकींवर येवून त्यांच्यावर दगडफेक केली. दगडफेकीमुळे गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सिद्धांत यांचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. तथापि, सिद्धांत शिरसाट आणि वाहन चालक सुरक्षित आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. हल्ल्याचे कारण आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शिरसाट कुटुंबाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.