महाराष्ट्रात होणाऱ्या बंदवर मुंबई उच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत महाविकास आघाडीच्या बंदला ब्रेक लावला आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे सांगत उद्याचा (२४ ऑगस्ट) बंद रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर महाविकास आघाडीकडून बंद मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत बंद रद्द केला असल्याची घोषणा केली. मात्र, विरोधकांनी हार मानली नाही, आता काळी फित बांधून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर, तर उद्धव ठाकरे शिवसेना भवनात काळी फित बांधून निषेध नोंदवणार आहेत. राज्यभरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
Very good news.thank you High court