बदलापूरमध्ये दोन लहान मुलांवर झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी निषेध मोर्चांचे आयोजन केले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या बंदविरोधात दखल घेतली आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की अशा संवेदनशील घटनांवरून कोणत्याही संघटनेने बंदचे आवाहन करणे बेकायदेशीर आहे. जर कोणी बंद करून आंदोलन केले तर सरकारने त्वरित कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. बंदच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हा मुद्दा मांडला होता.
याचिकेत राज्य सरकारला आवाहन करण्यात आले की, बंदामुळे सामान्य जनतेला होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने सक्रियपणे पावले उचलावी. याचिकाकर्त्याने बदलापूर येथे झालेल्या आंदोलनाचे आणि तेथील सार्वजनिक सेवा रोखून धरल्याचे पुरावे सादर केले. याच प्रकरणावर न्यायालयाने सरकारला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, बदलापूर घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने या घटनांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*