बदलापूर येथील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (उद्या) २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

ठाकरेंनी सांगितले की, शनिवारचा महाराष्ट्र बंद हा “संस्कृती विरुद्ध विकृती” असा असेल आणि तो दुपारी २ वाजेपर्यंत चालेल. त्यांनी हा बंद राजकीय नसून, बदलापूरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी आहे, असे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी सरकारला लोकल ट्रेन, बेस्ट बस आणि मेट्रो सेवा बंद ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच, दुकानांनाही बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. रुग्णवाहिका आणि वृत्तपत्रे मात्र सुरू राहतील.

राज्य सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाच्या वेळेवर कारवाईच्या अभावामुळेच ही घटना घडल्याचे सांगितले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला की, या बंदचा फज्जा उडवू नका, अन्यथा जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल.

या बंदच्या माध्यमातून जनतेने आपल्या अस्वस्थतेची प्रतिक्रिया व्यक्त करावी, असे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,077 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क