छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहनचोरीच्या घटनांनी आता गंभीर वळण घेतले असून, चोरट्यांनी दुचाकींनंतर थेट महागड्या एसयूव्ही गाड्यांना लक्ष्य केले आहे. छावणी आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महागड्या कार चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. यामध्ये लाल रंगाची महिंद्रा थार आणि तब्बल २७ लाख रुपये किमतीच्या टोयोटा फॉर्च्यूनरचा समावेश आहे. या घटनांमुळे शहरातील वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हॉटेलबाहेर पार्क केलेली थार गायब

पहिली घटना पडेगाव येथील मनीष इन हॉटेलबाहेर घडली. नूर ए सबा शेख शाकीर या पतीसह १२ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबल्या होत्या. हॉटेल व्यवस्थापकाच्या सूचनेनुसार त्यांनी लाल रंगाची थार (टीएस १२ ईएस ६५१५) बाहेरील पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता बाहेर आल्यानंतर गाडी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, ही २०२१ मॉडेलची थार नूर ए सबा यांचे पती मोहम्मद झहीर यांनी ३१ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील एका व्यक्तीकडून साडेतीन लाख रुपयांना खरेदी केली होती. खरेदीखत आणि करारनामा झाला असला, तरी आरटीओ हस्तांतरणाची प्रक्रिया बाकी होती. गाडी नावावर होण्याआधीच ती चोरीला गेली.

सीसीटीव्हीत चोरट्यांची हालचाल कैद

दुसरी घटना टाऊन सेंटरमधील एन-१ परिसरात घडली. सीए भानुदास जाधव यांच्या मालकीची २७ लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्यूनर (एमएच २३ बीसी ०१२३) १५ सप्टेंबरच्या रात्री चोरीला गेली. या प्रकरणाची एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

फॉर्च्यूनर चोरी करून नेताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरटे स्वतःच्या कारमधून आले आणि चोरीची गाडी घेऊन पसार झाले. मात्र, फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांकडून परिसरातील अन्य सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

543 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क