राज्य सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या मुख्यमंत्री बहीण योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
राज्यात 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहे. दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. यात आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे.
उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 830 रुपये मिळणार आहेत. या योजनेतंर्गत एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.
1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kqy4OPp3LZSAiLoBGmRmIl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
#मुख्यमंत्रीबहीणयोजना, #मोफतगॅससिलिंडर, #महिलांसाठीयोजना, #अन्नपूर्णायोजना, #महिलाकल्याण
#MukhyamantriBahiniYojana, #FreeGasCylinder, #WomenWelfare, #AnnapurnaScheme, #WomenEmpowerment