छत्रपती संभाजीनगर : येत्या शनिवारी, १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथे भद्रामारूनीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक पायी प्रवास करणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना आखल्या आहेत.

वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १२ एप्रिल मध्यरात्री ११ वाजेपर्यंत नगरनाका ते दौलताबाद टी पॉईंट आणि पुढे दौलताबाद घाट या मार्गावर सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. यामुळे पायी चालणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल, तसेच वाहतूक कोंडी व अपघात टाळता येतील.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत –

  • छत्रपती संभाजीनगरहून धुळे, कन्नडकडे जाणारी जड वाहने नगरनाका, ए. एस. क्लब चौक, साजापूर फाटा, करोडी नाका, कसाबखेडा मार्गे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग (NH-52) ने वळवण्यात आली आहेत.
  • तर धुळे, कन्नडकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहने माळीवाडा, शरणापूर टी पॉईंट, पडेगाव मार्गे वेरूळ, कसाबखेडा, साजापूर फाटा, ए. एस. क्लब चौक या मार्गाने शहरात येतील.

या बदलांमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरळीत होईल आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील. नागरिकांनी या बदलांबाबत सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

842 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क