छत्रपती संभाजीनगरातील ऐश्वर्या अविनाश आघाव हिने जगातील सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी आयर्नमॅन ७०.३ (हाफ आयर्नमॅन) स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पूर्ण करत मराठवाड्याच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. तिने ११३ किलोमीटरचे अंतर ७ तास ४८ मिनिटांत पूर्ण करून हा यशस्वी पराक्रम गाजविला आहे.

इटलीतील बोलोनिया सर्विया शहरात २२ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा झाली, ज्यामध्ये जगभरातील ६,५०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कठीण स्पर्धेत ऐश्वर्या आघावने आपल्या दृढ इच्छाशक्ती, शारीरिक क्षमता आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आयर्नवूमनचा किताब पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.

स्पर्धेचे आव्हान

आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेचे अंतर ११३ किलोमीटरचे असते, ज्यामध्ये १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते. ८ तास ३० मिनिटांत हे अंतर पूर्ण करणाऱ्यांना आयर्नमॅन किताब दिला जातो, मात्र ऐश्वर्याने ७ तास ४८ मिनिटांत हे अंतर पूर्ण करत आपली क्षमता सिद्ध केली.

वर्षभराची तयारी

संगणक शास्त्रात एम.टेक पदवी मिळवलेल्या ऐश्वर्याने मागील वर्षभरापासून या स्पर्धेची तयारी केली होती. नितीन घोरपडे, जो पाचवेळा आयर्नमॅन किताब पटकावणारा आहे, याच्या मार्गदर्शनाखाली तीने सराव केला. योग्य डाएट प्लॅन आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.

कौटुंबिक पाठबळ

“मी शारीरिक बळ वापरले असले तरी, मानसिक आधार हा माझ्या यशात महत्त्वाचा ठरला. आई-वडिलांनी दिलेला आत्मविश्वास आणि प्रशिक्षक नितीन घोरपडे यांचे मार्गदर्शन यामुळेच मी हे स्वप्न पूर्ण करू शकले,” असे ऐश्वर्याने आपल्या यशाबद्दल सांगितले.

आयर्नवूमन म्हणून ऐश्वर्याचा हा उल्लेखनीय प्रवास मराठवाड्याच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

596 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क