सिडको भागात दोन चोरट्यांनी महिलेशी गप्पा मारत, महिलेचा विश्वासघात करून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चोरट्यांनी महिलेच्या भोळ्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा गुन्हा केला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रंजना गाडेकर या घरकामानिमित्ताने सिडको भागात गेल्या होत्या. त्यांनी अंगावर २५ ग्राम सोन्याची चैन, ३ ग्राम सोन्याचे पेंडन आणि ५ ग्रामची अंगठी घातली होती. त्याचवेळी दोन अनोळखी युवकांनी त्यांच्याजवळ येत, “मावशी, एवढे सोने घालता का? हल्ली खूप चोऱ्या होत आहेत,” असे सांगून त्यांना गप्पांमध्ये गुंतवले.
चोरट्यांनी पुढे सल्ला दिला की, सर्व सोने पिशवीत ठेवावे जेणेकरून ते सुरक्षित राहील. रंजनाबाईंनी त्यांचा सल्ला मानून सोने पिशवीत ठेवले. चोरट्यांनी सोने आणखी आत ढकलण्याचा बहाणा करत ते हातचलाखीने चोरले.
घटनेनंतर रंजनाबाईंना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*