गणेशोत्सवाच्या आनंदमय वातावरणात संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या दोन तरुणांच्या बेदरकारपणामुळे तीन जणांचा हकनाक बळी गेला आहे. देसरकर कुटुंबावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. या कुटुंबाला तब्बल दहा वर्षांनंतर बाळ झालं होतं आणि बाळाचं बारसं आटोपून पुण्याला जात असताना हा भीषण अपघात घडला.

घटना लिंबेजळगाव परिसरातील नगर रोडवरील टोलनाक्याजवळ घडली. देसरकर कुटुंबाची कार आणि समोरून येणारी, दारूच्या नशेत चालवली जाणारी स्कॉर्पिओ, यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात मृणालिनी अजय देसरकर (38), आशालता घाटे (65) आणि दीड महिन्याचं बाळ यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

माहितीनुसार, स्कॉर्पिओ गाडी चालवणाऱ्या तरुणांनी दारू पिऊन वाहन चालवलं आणि दुभाजक ओलांडून देसरकर कुटुंबाच्या कारला धडक दिली. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या काळात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, कुटुंबावर काळाचं सावट कोसळलं आहे.

पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून, अपघात घडवणाऱ्या तरुणांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,608 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क