सायबर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. आरोपींनी आधार कार्ड आणि पॅनकार्डचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे बनावट बँक खाती उघडून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींच्या ताब्यातून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सिमकार्ड, डेबिट कार्ड आणि महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
हॉटेलवर छापा; आरोपी ताब्यात
गुप्त माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी निराला बाजार येथील एका हॉटेल वर छापा टाकला. आरोपी उत्सवकुमार भेसानिया (वय 23, सुरत, गुजरात), ऋषिकेश भागवत (वय 23, छत्रपती संभाजीनगर) आणि अनुराग घोडके (वय 21, छत्रपती संभाजीनगर) हे संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय आर्थिक फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.
बनावट बँक खाती आणि फसवणूक
तपासादरम्यान आरोपींनी 2022 पासून आधार कार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून विविध बँक खाती उघडली होती. या खात्यांचा वापर करून आरोपी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करून फसवणूक करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक मोबाईल फोन, सिमकार्ड आणि इतर दस्तऐवज जप्त केले आहेत.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून या फसवणुकीतील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*