शहरातील मधुर मिलन स्विट्स या अग्रगण्य मिठाई प्रतिष्ठानाविरोधात काही विघ्नसंतोषी लोकांनी खोडसाळपणा करत खोटे व्हिडीओ व्हायरल करून प्रतिष्ठानाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, गुन्हेगार लवकरच समोर येईल, अशी माहिती संस्थापक पदमसिंहजी राजपुरोहित यांनी दिली.

राजपुरोहित म्हणाले, “गेल्या ३० वर्षांपासून आम्ही आमच्या ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिठाई देत आहोत. आमच्याविरोधात व्हायरल झालेला व्हिडीओ दिल्ली येथील दोन वर्षांपूर्वीच्या घटनेचा असून, त्याचा आमच्या प्रतिष्ठानाशी काहीही संबंध नाही. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.”

मधुर मिलन स्विट्सने शुद्ध देशी तुपामध्ये बनवलेल्या मिठाईसाठी ओळख निर्माण केली आहे. काजू गजक, छना टोस्ट, रबडी, राजभोग यांसारख्या अनेक लोकप्रिय मिठाई प्रकारांसाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्तेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

या प्रकाराबाबत सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे, आणि लवकरच गुन्हेगाराला उघड केले जाईल, अशी माहिती राजपुरोहित यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

305 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क