१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा सोमवारी छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. यावेळी निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो मोफत खत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करावे. मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन कायगाव टोका येथे करण्यात येणार आहे, तर कमी उंचीच्या मूर्तींसाठी मनपातर्फे तयार करण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांचा वापर करावा.
गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक वॉर्डात निर्माल्य संकलन करण्यासाठी विशेष घंटागाड्या फिरवण्यात येणार आहेत. निर्माल्य नदी किंवा तलावात टाकण्याऐवजी घरातील कुंडीत ठेवल्यास त्यातून दर्जेदार खत तयार होऊ शकते. हे खत बागेतील झाडांसाठी वापरल्यास पर्यावरण रक्षणासह खत खरेदीचा खर्चही वाचू शकतो, असे मार्गदर्शनही प्रशासकांनी केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*