डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीनंतर निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भरती गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू होतील.
दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर
विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांसाठी दिवाळी सुट्ट्या २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर विभाग व धाराशिव उपपरिसरातील सुट्ट्या २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान राहतील आणि या विभागांचे कामकाज ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल. संलग्नित महाविद्यालयांना २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या देण्यात आल्या असून, महाविद्यालयांचे द्वितीय सत्र १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
परीक्षांमध्ये बदल
विद्यापीठाच्या पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत. पूर्वी या परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या, मात्र आता त्या पुढे ढकलून पदवीच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा यामध्ये समाविष्ट असतील. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे सहायक उपकुलसचिव भगवान फड यांनी सांगितले.
शैक्षणिक वेळापत्रक निश्चित
मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एप्रिलमध्येच वेळापत्रक जाहीर केले होते. पहिल्या सत्राचा कालावधी १५ जून ते २५ ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आला असून, द्वितीय सत्र १६ नोव्हेंबरपासून १ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*