नाथसागर जलाशयातील पाणीपातळी वाढल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज दुपारी 15:30 ते 16:00 या वेळेत गेट क्रमांक 10 ते 27 असे एकूण 18 गेट्स 1.5 फुटांवरून 2 फुटांवर उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीतून वाहणारा विसर्ग 9432 क्युसेकने वाढवला जाईल.
वर्तमान विसर्ग 28296 क्युसेक असताना या नव्या विसर्गामुळे एकूण पाणीप्रवाह 37728 क्युसेक होईल. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाचा इशारा
गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*