“देशाचे युवक हे देशाचे भविष्य आहेत,” असे मत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज एमआयटी महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केले. त्यांनी युवकांना आपल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून मिळते, याची जाणीव करून दिली. त्यांनी युवकांना आवाहन केले की त्यांनी मतदानाचा हक्क बजावत भविष्यातील देशाच्या विकासात योगदान द्यावे.
एमआयटी महाविद्यालयात १०८ औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) उपक्रमाच्या अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, एमआयटीचे महासंचालक मुनिश शर्मा, उपकुलसचिव मकरंद वैष्णव आणि स्वीप नोडल अधिकारी दीपाली थावरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी भारूड व गीते सादर केली. यानंतर मतदार जनजागृतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी आपल्या भाषणात म्हणाले की, “मतदान करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. युवकांनी आपला मतदानाचा हक्क नक्कीच बजवावा आणि इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करावे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*